Saturday, May 11, 2024
Homeनाशिकटोळक्याकडून एसटी चालकास मारहाण

टोळक्याकडून एसटी चालकास मारहाण

नाशिक । Nashik

अचानक रस्त्यावर बस थांबवली या कारणातून दुचाकीस्वार टोळक्याने बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.27) सायंकाळी महामार्गावरील अमृतधाम परिसरात घडली.

- Advertisement -

नवनित मिथीलेश पटेल (22 रा.शिवकृपानगर,हिरावाडी), अंगत दत्तात्रेय देवरे (26 रा.आयोध्यानगरी,साईनगर), वैभव राजेंद्र कर्डक (29 रा.साईनगर,अमृतधाम) आणि सचिन ज्ञानेश्वर निकम (रा.शिवकृपानगर,हिरावाडी) अशी बसचालकास मारहाण करणार्‍या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल सजन शिंदे (रा.संजयनगर,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे एस.टी.महामंडळात चालक पदावर कार्यरत असून, रविवारी सायंकाळी ते नाशिक जळगाव (एमएच 40 एन 9832) याबसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली.

प्रवाश्यांना घेवून ते जळगावच्या दिशेने जात असतांना महामार्गावरील अमृतधाम चौफुली भागात ते सर्व्हीस रोडने जात असतांना दुचाकीस्वार संशयीत टोळक्याने मोटारसायकली आडवी लावून बस थांबविली. यावेळी संतप्त टोळक्याने बस कोठेही उभी करतो असा जाब विचारत चालकास कॅबीनमधून ओढून काढत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

यावेळी संशयीतांनी पुन्हा या रोडवर दिसला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द मारहाण आणि शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या