Thursday, April 25, 2024
Homeजळगावएस.टी.बस अपघात ; 15 प्रवाशी जखमी

एस.टी.बस अपघात ; 15 प्रवाशी जखमी

मुक्ताईनगर – Muktainagar

तालुक्यातील पारंबी ते कुर्‍हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसला अपघात झाल्याने त्यात दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

- Advertisement -

दरम्यान सदर अपघात बसचे टायर फुटल्याने झाल्याचे समजते याबाबत समजलेली माहिती अशी की मुक्ताईनगर आगाराची बस क्रमांक एम एच 20 बी एल 17 70 ही बस प्रवाशांनी भरून पारंबी कडे जात असताना पारंबी ते कुर्‍हा दरम्यान असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटल्याने बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले व बस रस्त्यावरून रस्त्याच्या खाली उतरले परंतु बस चालकाने सदर बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला यात आळंद सुनील झांबरे वय 22 वर्षे मानेगाव येथील समाधान तायडे वय 69 वर्षे वडोदा येथील कमल गोविंदा पवार वय 59 वर्षे जानोकार त्र्यंबक महाले वय 75 वर्षे वेळ सांगवे येथील अनुराधा पाटील वय 35 वर्षे शिरसोली येथील कस्तुराबाई भोलांकर वय 70 वर्षे जामनेर येथील सपना विनोद पाटील वय 27 वर्षे तसेच जामनेर येथीलच सार्थक विनोद पाटील वय दोन वर्षे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ची परिस्थिती अतिशय वाईट झाले असेल त्या बसेसला आवश्यक असलेली दुरुस्ती व त्या कामे लागणारे साहित्य हे संबंधित विभागातर्फे वेळेवर उपलब्ध करून दिले जात नसल्याने वारंवार वाहने रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभे राहणे कधी ब्रेक फेल होणे तर कधी टायर न बदलल्यामुळे टायर फुटण्याचे प्रकार होत असतात त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे यामुळे सदर वाहनांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे आहे याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधूनही बऱ्याचदा संबंधित विभागाच्या तांत्रिक अडचणी सोडविल्या जात नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे परंतु यामुळे प्रवाशांच्या व एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा वैरणीवर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या