Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याSSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

मुंबई

दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result)झाला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. निकालानुसार जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

- Advertisement -

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त १०० टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९९.८४ टक्के लागल आहे. नाशिक

निकालात गेल्या काही वर्षांप्रमाणे मुलीच अव्वल राहिल्या आहे. १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ६ हजार ९२२ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहे.

यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.

निकाल असा पाहा

ssc.ac.in आणि mahahsscboard.in जा

SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.

आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.

लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या