Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSSC Exam 2022 : 'या' तारखेपासून दाखल करता येणार दहावीच्या परीक्षेचे अर्ज

SSC Exam 2022 : ‘या’ तारखेपासून दाखल करता येणार दहावीच्या परीक्षेचे अर्ज

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१० वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज १८ नोव्हेंबरपासून घेतले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

तसेच दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे, तसेच खासगी विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे.

माध्यमिक शाळांनी चलानद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विलंब शुल्कासह दहावीचा अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या