Thursday, April 25, 2024
Homeधुळेशिक्षकासह एसआरपीएफ जवान करोनाबाधीत

शिक्षकासह एसआरपीएफ जवान करोनाबाधीत

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिक्षकासह एसआरपीएफचा जवान कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात 24 तासात दहा बाधीत आढळले.

- Advertisement -

धुळे तालूक्यातील कापडणे येथील 39 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालय येथील चार, महापालिका सीसीसी मधील रॅपिड अँटीजन टेस्टचे दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तीन, खाजगी लॅबमधील एक असे दहा बाधीत सोमवारी 24 तासात आढळले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कापडणे येथील 39 वर्षीय महिला उपचार घेत होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यत कोरोनाचे 378 जण बळी गेले आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 13 हजार 825 वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या