Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमराठमोळे 'श्रीकांत दातार' हार्वर्ड बिजनेस स्कूलचे नवे डीन

मराठमोळे ‘श्रीकांत दातार’ हार्वर्ड बिजनेस स्कूलचे नवे डीन

दिल्ली | Delhi

भारतीय वंशाचे मराठमोळे श्रीकांत दातार (Srikant Datar) यांची हार्वर्ड बिजनेस स्कूल (Harvard Business School)च्या डीन पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीकांत दातार 1 जानेवारी 2021 पासून पदभार स्वीकारणार आहेत. 112 वर्ष जुन्या हावर्ड बिझनेस स्कूलचे श्रीकांत हे दुसरे भारतीय वंशाचे डीन आहेत. श्रीकांत दातार हे 1973 साली University of Bombay मधून पदवीधर झाले आहेत. त्यानंतर Indian Institute of Management, Ahmedabad मधून पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत. दातार यांनी भारतामध्ये शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेच्या Stanford University मध्ये मास्टर्स डिग्री statistics and economics मध्ये तर पीएचडी business मध्ये केली आहे.

श्रीकांत दातार यांना शिक्षक म्हणून अध्यापनाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या कार्याचा गौरव George Leland Bach Teaching Award देऊन करण्यात आला आहे. 1996 साली हावर्ड बिझनेस स्कूल जॉईन केले. तेथे देखील ते प्राध्यापक होते. हळू हळू त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले.

“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढचे डीन असणार आहे” अशी माहिती अध्यक्ष लॅरी बैकोव यांनी दिली आहे. तसेच “श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत” असं देखील लॅरी बैकोव यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या