Photos # नंदुरबार येथे डिजेमुक्त श्री विसर्जन मिरवणुकाना सुरुवात

jalgaon-digital
2 Min Read

राकेश कलाल

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरातील (Nandurbar city) श्री विसर्जन मिरवणुकाना (Shri Visarjan Mirvanukana) जल्लोषात प्रारंभ (Start with a bang) झाला आहे. शहरातील प्रथम मानाचा श्री दादा गणपतीची (First Honorable Shri Dada Ganapati) विसर्जन मिरवणूक (Immersion Procession) सुरू झाली आहे . रात्री ९ च्या सुमारास मिरवणुकीचे आकर्षण असलेली दोन्ही मानाच्या (Both are of Ganesha) गणपतींची हरिहर भेट (Visit Harihar) होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार येथील गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. कोरोना काळात दोन वर्ष कोणत्याही सण उत्सवावर निर्बंध होते. यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरा करण्यात आल. गेल्या दहा दिवसांपासून विविध गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले होते. अनेकांनी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. आज शहरासह जिल्ह्यातील सर्व मंडळातर्फे श्री विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्यात.

सकाळपासून ढोल ताशांच्या गजरात मात्र डिजेमुक्त मिरवणुकांना जल्लोषात प्रारंभ झाला. मानाच्या श्री दादा गणपतीची आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जि.प.उपाध्यक्ष ऍड. राम रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या मिरवणुकीत आबाल वृद्धांसह महिला व तरुणींनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक ठिकाणी चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या विसर्जन मिरवणुकाचे आकर्षण म्हणजे शहरातील मानाचे श्री दादा व श्री बाबा गणपतीची हरिहर भेट. शहरातील जळका बाजार परिसरात या दोन्ही गणपतींची समोरासमोर भेट होते. दादा गणपतीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून जळका बाजार परिसरात येते. तोपर्यंत बाबा गणपतीची मिरवणूक एकाच जागी असते. आज रात्री ९ च्या सुमारास सदर हरिहर भेट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येथील माजी उपनगराध्यक्ष छोटालाल माळी यांचे काल निधन झाल्याने माळी वाड्यातील श्री विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *