Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाबंदीनंतर श्रीसंतचे मैदानात पुनरागमन

बंदीनंतर श्रीसंतचे मैदानात पुनरागमन

मुंबई । Mumbai

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवार २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळून आल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. पण आता ही बंदी उठल्यावर तब्बल ७ वर्षांनंतर तो मैदानात पुनरागमन करणार आहे.

- Advertisement -

एक मोठी स्पर्धा भारतामध्ये येत्या काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे . या स्पर्धेमध्ये तो आपला सहभाग नोंदवणार आहे.

७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपल्याला दिसून येणार आहे. केरळ संघाने आपल्या संघाकडून त्याला खेळण्याची संधी दिली आहे. त्याने लॉकडाऊन असताना नेट्समध्ये कसून सराव केला होता.

आपल्या फिटनेसवरही आपले लक्ष केंद्रित केले होते. संजू सॅमसनही या स्पर्धेत सहभागी होणार आहे . भारतामध्ये पुढील वर्षी १० जानेवारीपासून सय्यद मुस्ताक अली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २ जानेवारीला बीसीसीआयने ठरवलेल्या केंद्रांवर जायचे आहे.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी ३६ वर्षीय श्रीसंतवर ऑगस्ट २०१३ या वर्षी बंदी घालण्यात आली होती. त्याच्यासोबत अजित चंडिला आणि अंकित चव्हाण हे दोघेही राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दोषी आढळून आले होते. जैन यांनी ७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशावरून ही बंदी ७ वर्षांवर कमी करण्यात आली होती.

यामुळे त्याला ऑगस्ट २०२० पासून पुन्हा क्रिकेट खेळता येईल . ते पुढे म्हणाले की , त्याचे वय ३० वर्षांच्या पुढे आहे . एक क्रिकेटर म्हणून आपले नावलौकिक वाढवण्याचा काळ आता संपला आहे. बीसीसीआयने २८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सामन्यादरम्यान हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न श्रीसंतने केला होता.

यावर श्रीसंतचे वकील स्पष्ट म्हणाले की, आयपीएल सामन्यादरम्यान कोणतेही फिक्सिंग झाले नव्हते. या संदर्भातील पुरावे उपलब्ध नाहीत. वकिलांनी सांगितले की, दूरध्वनीवरून साधण्यात आलेल्या संभाषणामधून पैशाची देवघेव झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. आयपीएल सामन्यादरम्यान १४ देण्यासाठी त्याला १० लाख रुपये देण्यात आले होते. पण श्रीसंतने हे सर्व आरोप फेटाळले होते

-सलिल परांजपे, नाशिक .

- Advertisment -

ताज्या बातम्या