Tuesday, April 23, 2024
Homeजळगावचाळीसगाव : निर्जुंतुकीकरणासाठी फवारणी मोहिम

चाळीसगाव : निर्जुंतुकीकरणासाठी फवारणी मोहिम

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरी भागासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असल्याने कोरोनाला अटकाव करण्यासाठी भारतीय बंजारा क्रांतीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण भागात मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळातर्फे निर्जुंतुकीकरणासाठी फवारणी मोहिम राबविली जात आहे. फवारणी मोहिमेबरोबरच कोरोनापासून बचावासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे.

- Advertisement -

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज प्रत्येक गावातून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात शासकिय यंत्रणाना कोरोनाच्या रोखथामसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतू ग्रामपंचायत स्तरावर त्याला मर्यादा येत असल्यामुळे मोरसिंगभाई राठोड सारखे समाजसेवक स्वता;हुन पुढे येत आहे. कोरोनाला हटकाव करण्यासाठी मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळातर्फे ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गावात निर्जुंतुकीकरणासाठी फवारणी मोहिम राबविली जात आहे. या मोहिमे अतर्ंगत आतापर्यंत तालुक्यातील गोरखपूर, पिंपखेड, राजणगांव, बाणगाव, खेरडे, सांगवी, तळोंदा, लोंजे, शिवापूर आदि गावांमध्ये निर्जुंतुकीरणासाठी संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली आहे. व चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील फवारणी करण्यात येत आहे. फवारणीबरोबर कोरोना पासून बचावासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. यात आजार अंगावर काढू नका, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करा, सतत हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर जाणे टाळा, कोरोना रुग्णाचा तिरस्कार करु नका, लसीकरण करुन घ्या आदि संदेश दिले जात आहे. मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळाच्या या मोहिमेचे तालुक्यातून कौतूक होत असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या