Friday, May 10, 2024
Homeनगरक्रीडा उपसंकुलासाठी निधी द्या - आ. काळे

क्रीडा उपसंकुलासाठी निधी द्या – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरालगत प्रस्तावित असलेल्या क्रीडा उपसंकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील

- Advertisement -

नगर तालुक्यातील पारगाव-भातोडी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले युवा केंद्राची उभारणी करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.

पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या क्रीडा उपसंकुलाबाबत तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील पारगाव-भातोडी या गावात स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले युवा केंद्राची उभारणी करण्याबाबत मागणी मांडली.

कोपरगाव शहरातील तरुणाईला सोयीस्कर होईल असे कोपरगाव शहरालगत क्रीडा उपसंकुल होणे गरजेचे आहे. शहरात अनेक खेळांत पारंगत असलेले खेळाडू असून त्यांना नियमित सरावासाठी व विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहरात सुविधा उपलब्ध नाही. शहरालगत क्रीडा संकुल व्हावे अशी कोपरगाव शहरातील तरुणाईची मागणी आहे.

शहरालगत खेळाडूंना उपयोगात येईल अशा प्रस्तावित असलेल्या क्रीडा उपसंकुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी खेळाडू सराव करू शकतील त्यासाठी क्रीडा उपसंकुल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी मंत्री ना. तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री ना.तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या