Thursday, April 25, 2024
Homeनाशिकक्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

नाशिक l क्रिडा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे प्रशांत भाबड यांचे करोनासंसर्ग झाल्याने निधन झाले. गेलय 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

दिवंगत भाबड हे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स. रुंगटा हायस्कूल नाशिक या शाळेचे क्रिडा शिक्षक होते.

- Advertisement -

जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाकडे वळावेत यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला होता. क्रिडा शिक्षक व मनमिळाऊ मित्र गमावल्याचे दु:ख नाशिकच्या क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अखेर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली.

भाबड यांच्या मृत्यूमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या