सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi
कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेले भारत बंद आंदोलन सुरू झाले आहे.
- Advertisement -
शेतकऱ्यांच्या या बंदला सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोपरगाव तालुक्यात पोहेगाव येथे आज शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
पूर्ण गाव बंद ठेवत शेतकरी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी नऊ वाजता पोहेगांव परिसरातील व्यापारी संकुलातील गाळे उघडली जातात मात्र व्यापारी असोसिएशनने एकत्र येत एकमुखी निर्णय घेत संपूर्ण गाव बंद ठेवले आहे. करोना काळात लाँकडाऊन नंतर पुन्हा पोहेगाव बंद असल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले.