Friday, April 26, 2024
Homeनगरसूतगिरणी रेल्वे गेट ते गोंधवणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुरू करा; अन्यथा...

सूतगिरणी रेल्वे गेट ते गोंधवणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुरू करा; अन्यथा घेराव आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भैरवनाथनगर हद्दीतील सूतगिरणी रेल्वे गेट ते गोंधवणी गावापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी भैरवनाथनगर येथील सर्व ग्रामस्थाच्यावतीने आ. लहूजी कानडे यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी शिवाजी जनार्दन लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खादी ग्रामोद्योग व्हा.चेअरमन प्रवीण फरगडे, वसंत तात्याबा लबडे, ग्रामपंचायत सदस्य आकाश थोरात, वसंत पराजी देवकर, प्रशांत भोसले, नितीन लबडे, अ‍ॅड. रविंद्र भोसले, रिटायर्ड जज्ज आनंद भोसले, जनार्दन शेळके उपस्थित होते.

श्रीरामपूर मतदार संघातील सूतगिरणी रेल्वे (दुर्गानगर) ते गोंधवणी गावापर्यंतचा 100 फुटी रिंग रस्ता असून श्रीरामपूर शहरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्यावरून वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत तसेच रस्ता खचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दुचाकी व चारचाकी कार चालविण्यास अत्यंत अडचणी येतात. हा रस्ता अतिशय गैरसोयीचा झालेला असून अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. यापूर्वी अपघात होऊन दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरातील लोकामध्ये मोठा असंतोष झालेला आहे. तरी सदर काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा सर्व ग्रामस्थांच्यावतीने घेराव आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावर आ. लहू कानडे यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पंचायत समिती सभापती संगीताताई शिंदे यांना देण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी डॉ. भूषण लाहोरे, किशोर कुमावत, नितीन फरगडे, निखील थोरात, आकाश गव्हाणे, सुरेश तुरकणे, प्रमोद फरगडे, दिगंबर फरगडे, संतोष उदेवाळ, अनिल काळे, अण्णा काळे, प्रमोद लाहोरे, फिरोज शेख, विजय जाधव, बाळासाहेब बागुल, श्रीकृष्ण परदेशी, विजय सैलोत, दिलीप साळवे, सुधीर लोंढे, एकनाथ काळे, बापूसाहेब काळे, लहारे काका, भाऊसाहेब कांबळे, प्रदीप कुमावत, कांता कुमावत, संतोष उद्देवाळ, राजू कुमावत, सुनील लांडे सुधीर गायकवाड, विशाल गायकवाड, आदित्य नवाळे, गणेश परदेशी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या