Saturday, April 27, 2024
Homeनाशिकस्पाइस जेट नाशकात उभारणार 'कोविड टेस्टिंग लॅब'

स्पाइस जेट नाशकात उभारणार ‘कोविड टेस्टिंग लॅब’

सातपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद पाठोपाठ स्पाइसजेटने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत चा नाशिकमध्ये कोविड टेस्टिंग लॅब कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे…

- Advertisement -

आईसीएमआर आणि स्पाइसजेट यांच्या संयुक्त विद्यमाने स्पाइस हेल्थ नावाने विमान प्रवासी आणि शहरवासीयांना देखील अल्पदरात ‘आरटीपीसीआर’ तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्पाइस जेटने यापूर्वी आयसीएमआर सोबत ‘स्पाइस हेल्थ’ या नावाने दिल्लीमध्ये अशाच प्रकारच्या १० ‘ मोबाईल व्हॅन लॅब’ स्वरूपात सुरू केल्या आहेत.

या चाचणीसाठी इतरत्र साधारणपणे दोन हजारापेक्षा जास्त रुपये तपासणीसाठी घेतले जात असताना दिल्लीत अवघ्या ४९९ रुपयात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानंतर महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे ही तपासणी सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘भारतच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विमान कंपन्यांनी त्या देश किंवा राज्यसाठी मार्गदर्शक सूचनांनुसार किमान ७२ तासातील आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक केली आहे. ही तपासणी करून घेण्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागते.

नाशिक विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या प्रमुख तीन शहरांना विमानसेवा देतं असलेल्या स्पाइसजेटने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत चा नाशिकमध्ये कोविड टेस्टिंग लॅब कार्यान्वित करण्याचा निर्णय येतला आहे.

नाशिककरांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू या तीन शहरांसाठी विमानसेवा दिली जात आहे. सुरत आणि कोलकाता शहरासाठी लवकरच सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांसह शहरवासीयांसाठी ही लॅब उपयुक्त ठरणार आहे.

मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, आयमा

- Advertisment -

ताज्या बातम्या