Monday, April 29, 2024
Homeधुळेभरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली : चार ठार

भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली : चार ठार

धुळे । Dhule । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Agra National Highway) गव्हाणे फाट्यानजीक (Gavane Fatya) आज दुपारी भिषण अपघात (terrible accident) झाला. शिरपूर येथे कानबाईचा उत्सव (Festival of Kanbai) आटोपून नाशिककडे निघालेली भरधाव कार (car) उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर (vertical tractor trolley) धडकल्याने (hitting) चार जण जागीच ठार (Four people died on the spot) झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्याचा सहभाग आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

संदीप शिवाजी चव्हाण, मिना संदीप चव्हाण (रा. नाशिक), गणेश थोटू चौधरी (रा. चोपडा जि. जळगाव) आणि ट्रॅक्टर चालक पांडुरंग धोंडु माळी (55 रा. सोनगीर ता. धुळे) अशी चौघा मृतांची नाव आहेत.

संदीप चव्हाण हे पत्नी मिना आणि एक चार वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुली असे चौघे मित्राची कार (क्र.एमएच 02 डीएस 1277) घेवून शिरपूर येथे शालक दशरथ नाना कोळी यांच्याकडे कानबाई मातेच्या उत्सवासाठी आले होते. आज उत्सव आटोपून ते कारने नाशिकला घराकडे निघाले होते. कार ही संदीप चव्हाण हेच चालवित होते. त्यादरम्यान सुराय गव्हाणे फाट्यानजीक पुलावरून खाली उतरतांना त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली.

त्यात कारमध्ये बसलेले चव्हाण दाम्पत्य व अन्य गणेश चौधरी हे गंभीर जखमी होवून ठार झाले. तर ट्रॅक्टरखाली दुरूस्तीचे काम करणारा चालक चालक पांडुरंग माळी हे देखील जागीच ठार झाले. तर चिमुकल्यांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भिषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नरडाणा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. गंभीर जखमींना तत्काळ धुळे जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच चव्हाण यांचे शालक दशरथ कोळी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अपघातातील कारमधील मयत गणेश चौधरी हे चव्हाण यांचे नातेवाईक नाहीत. ते प्रवासी म्हणून बसले असावे, असा कयास लावला जात आहे. याबाबत उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या