Friday, April 26, 2024
Homeनाशिकगतिरोधक ठरतोय धोकादायक

गतिरोधक ठरतोय धोकादायक

जानोरी । संदीप गुंजाळ Janori

विमानतळ (airport) ते दहावा मैल रस्त्यावरील बांधकाम विभागाकडून (Construction Department) झालेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे अपघातांना (accident) निमंत्रण मिळत आहे. जिवितहानी देखील झाली असतांनाच सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) यात लवकरात लवकर सुधारणा करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

नाशिक विमानतळ (nashik airport) सुरू करण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांचे स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी तसेच तत्कालीन खासदार समीर भुजबळ (Former MP Sameer Bhujbal) यांच्या परिश्रमातून नाशिक विमानतळाची निर्मिती झाली. एका दिमाखदार सोहळ्यात विमानतळाचे उद्घाटन (Inauguration of the airport) झाले. अवघ्या जिल्ह्याने हा सोहळा आजही डोळ्यात साठवून ठेवलेला आहे.

नंतर झालेला सत्ताबदल व त्यानंतर दहावा मैल ते विमानतळ रस्ता पुर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणी सर्वश्रुत आहे. त्यानंतर तब्बल पाच वर्षांच्या सत्ताबदलेनंतर पुन्हा या रस्त्याला चालना मिळाली व दहावा मैल ते विमानतळ रस्ता पुर्ण झाला. तसा हा रस्ता पुर्ण होण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Health Minister Dr. Bharti Pawar) व खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचे योगदानही विसरून चालणार नाही.

रस्ता पुर्ण झाला खरा परंतु नको त्या ठिकाणी गतिरोधक (speed braker), नको त्या ठिकाणी रस्त्यावरील दूभाजकाला रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवून वयक्तिक संबंध जोपासण्यासाठी केलेला मार्ग, विमानतळ रस्त्यावरील अतिक्रमणे हे वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

जानोरी (janori) फाट्यावरील चौफुलीवरील दृश्य बघितले तर ते खुपचं भयावह दिसते. रस्ता दुभाजक (Divider) संपल्यावर तेथे चांगल्या प्रकारचे गतिरोधक ठेवणे अपेक्षित आहे परंतु तेथे जरा कंजुषी केल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर साधारण 50 ते 60 फुटांवर परत एक छोटासा गतिरोधक ठेवण्यात आले असून तेथे रस्ता दुभाजक नसल्याने तो टाळण्यासाठी वेगाने येत वाहनचालक दुसर्‍या बाजुने समोरून येणार्‍या वाहनांची पर्वा न करता तो गतिरोधक टाळतात.

परंतु तो टाळत असतांना समोरील येणार्‍या वाहनांचा अंदाज येत नाही व लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळते. याठिकाणी कधी मोठा अनर्थ होवून जीवीतहानी होण्याची देखील दाट शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या लक्षात आणून देवून ही याकडे दुर्लक्षीत केले जाते ही मोठी शोकांतिका आहे.

विमानतळ असल्याने या रस्त्यावरून मंत्री महोदयच नाही तर प्रशासकीय अधिकार्यांची कायम रेलचेल असते. त्यावेळी प्रत्येक धोकादायक ठरेल अशा जागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. त्यामुळे अचानक कोणी आडवे येवून अपघात होण्याची शक्यता धुसर असली तरी इतर वेळी सर्व सामान्य नागरिकांची कोण काळजी घेणार ? हा मोठा विषय आहे.

फक्त मंत्र्यांचाच जीव महत्वाचा असतो का? सर्वसामान्य लोकांच्या जीवाची काहीच मोल नसतो का? असा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतांनाच संबंधित विभागाने सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली असल्याने नवल वाटत आहे. अक्राळे फाटा ते विमानतळ हा रस्ता देखील आजच्या परिस्थितीत पुर्ण खराब झाले असून सध्या तो रस्त्याही पुर्ण खड्डे झाले असुन वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.

संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष केंद्रित करून हा रस्ता नागरिकांसाठी पुर्ण सुरक्षित होईल यापध्दतीने विचार करून चुकांची दुरुस्ती करून सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या