Friday, April 26, 2024
Homeनगर15 चारीवरील गतिरोधकावर पांढरे पट्टे न लावल्यास आंदोलन - सदाफळ

15 चारीवरील गतिरोधकावर पांढरे पट्टे न लावल्यास आंदोलन – सदाफळ

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील 15 चारी जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या दोन्ही गतिरोधकांवर पांढर्‍या रंगाचे पट्टे नसल्यामुळे वाहन धारकांना या गतिरोधकाचा अंदाज येत नाही. परिणामी याठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या दोन्ही गतिरोधकांवर पांढर्‍या रंगाचे पट्टे काढावेत अन्यथा 15 चारी येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष हेमंत सदाफळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

- Advertisement -

हेमंत सदाफळ म्हणाले, या गतिरोधकावरून जाणार्‍या नागरिकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्यामुळे दैनंदिन अपघात घडतात. दुचाकीस्वारांना प्रामुख्याने याचा मोठा त्रास होत आहे. दुचाकीवर पाठीमागे महिला व छोटी बालके बसून प्रवास करतात. रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या दुचाकीस्वारांना येथे असलेल्या गतिरोधकचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक महिला व बालक दुचाकीने जोरात उंच उडी घेतल्याने रस्त्यावर पडतात. तसेच वेगाने जाणार्‍या चारचाकी वाहन चालकांची हीच परिस्थिती होते.

अचानक गतिरोधक पाहून चारचाकी वाहन चालक ब्रेक लावतो. त्यामुळे मागून येणार्‍या दुचाकी किंवा चारचाकी यांना समोरचे वाहन थांबण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत होत चालले आहे. नियमित होणार्‍या अपघातामुळे अनेक नागरिक जखमी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी असणार्‍या दोन्ही गतिरोधकावर पांढरे पट्टे मारून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, असे न झाल्यास परिसरातील नागरिक याच ठिकाणी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष हेमंत सदाफळ यांनी दिला आहे.

15 चारी येथील दोन्ही गतिरोधकवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी होतात. बांधकाम विभागाने तात्काळ या गतिरोधकांवर निशाणीचे पट्टे देणे गरजेचे आहे.

– सुबोध बोठे, 15 चारी नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या