Saturday, April 27, 2024
Homeजळगावदिवाळीमुळे स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल

दिवाळीमुळे स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्यात तसेच इतर राज्यांतर्गत सद्यास्थितीत विशेष रेल्वे प्रवासी गाडया सुरू करण्यात आल्या आहेत. या स्पेशल गाडयांमधे आरक्षित तसेच कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच गाड्यांमध्ये प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

तिकीटाचे आरक्षण परंतु वेटींग लिस्टवर असेल तर अशा प्रवाशांना दिवाळी पर्वादरम्यान प्रवास करता येणार नसल्याचे रेल्वे प्रशासन सुत्रांनी म्हटले आहे.

त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कुटूंबासह गावी जाऊन परत येण्याचा प्रवास कसा करावा, ही चिंता अनेक प्रवाशांना भेडसावत आहे.

गेल्या महिनाभरापासून 9 ते 20 नोव्हेंबरदरम्यान रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहेत. अनेक जणांनी तिकीटे काढली असली तरी वेटींग तिकीटे देखील आहेत.

परंतु कोरोनामुळे वेटींग तिकीट धारकांना लांब पल्ल्याचा प्रवासासाठी रेल्वे स्थानकांतच प्रवेश करण्यास मनाई असल्याचे रेल्वे सूत्रांनी म्हटले आहे.

यांचा समावेश

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, नागपूर- पुणे एक्स्प्रेस,मुंबई- नागपूर एक्स्प्रेस, अहमदाबाद -चेन्नई एक्स्प्रेस

रेल्वेगाड्यांची संख्या कमी

सद्य:स्थितीत रोजगार, नोकरी, उद्योग व्यवसाय, कामकाजानिमित्त रहात असलेले अनेक जण दिवाळीनिमित्त घरी, आप्तस्वकीयांकडे जाण्याचे बेत करतात अथवा सुटीमधे सहलीचे नियोजन करत आहेत.

परंतु, यावर्षी कोरोनामुळे या परंपरेला फाटा द्यावा लागणार आहे. दिवाळीत सर्वसाामान्य प्रवासी रेल्वे गाड्या कमी असून आरक्षित तिकीटे घेऊनच कन्फर्म असेल तरच प्रवास करता येणार आहे. वेटींग लिस्टवरील तिकीटावर प्रवास करता येणार नाही. इतकेच नव्हेतर वेटींग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे.

सामान्य तिकीटधारकांना प्रवासाची मुभा नाहीच

राज्यातच नव्हेतर देशभरात कोरोना साथरोग प्रसार प्रादुर्भाव टाळण्यासाठी दि. 23 मार्च 2020 पासूनच रेल्वे, बस, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येवून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

त्यानंतर मात्र जून नंतर अनलॉक प्रकियेनंतर हळूहळू स्पेशल रेल्वे प्रवासी वाहतूकीला परवानगी देण्यात आली होती. यात देखिल आरक्षीत तिकीटे घेवून तसेच केवळ परराज्यात कोणत्याही इच्छित स्टेशनवर उतरण्यास परवानगी देण्यात आली होती.

त्यानंतर मात्र राज्यातंर्गत प्रवासाला मान्यता देण्यात येवून केवळ आरक्षीत तिकीटांवरच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली असून मासिक पास वा साधे तिकीट घेउन प्रवास करण्यास अजून परवानगी मात्र देण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या