Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकशाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष शोध मोहीम’

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष शोध मोहीम’

नाशिक | Nashik

करोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत कुटूंबांसमवेत स्थलांतरित झालेली लाखो विद्यार्थी गेली वर्षभर शिक्षणापासून दुरावली गेली आहेत. या विद्यार्थ्यांसह अन्य शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शाळाबाह्य बालकांना शोधण्यासाठी १ ते १० मार्च या कालावधीत ‘विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

मोहिमेत ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, या संदर्भात बैठक झाली हाेती. त्यावेळी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी ‘विशेष शोध मोहीम राबविण्यात बैठकीत चर्चा झाली.

त्यानंतर ही मोहीम प्रत्यक्षात राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी अध्यादेश काढला आहे. विशेष शोध मोहिमेतंर्गत राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र, वॉर्ड, गाव अशा विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

येथे घेणार बालकांचा शोध

– प्रत्येक गावात, शहरात गजबजलेल्या वस्त्या- रेल्वे स्टेशन, बस स्थानक- गुऱ्हाळ घर, वीटभट्टया, दगडखाणी, मोठी बांधकामे, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या

– झोपड्या, फुटपाथ, सिग्नल

– लोककलावंताची वस्ती

शोध मोहिमेची जबाबदारी

– नोडल अधिकारी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी

– पर्यवेक्षक : केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक

– प्रगणक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका/मदतीस

- Advertisment -

ताज्या बातम्या