Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसमृद्धीचा कामास सिन्नरमध्ये वेग, इगतपुरीत अडखळत

समृद्धीचा कामास सिन्नरमध्ये वेग, इगतपुरीत अडखळत

नाशिक

समृद्धी महामार्ग येत्या 1 मे पासून अंशतः सुुरु होणार आहे. राज्यातील नाशिकसह 10 जिल्ह्यांतून जाणार्‍या या मार्गाच्या कामास सिन्नर तालुक्यात वेग आला आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात अडखळत काम सुरु आहे. इगतपुरी तालुक्यात काही शेतकर्‍यांनी काम रोखून धरले आहे. समृद्धीचा हा स्पेशल रिपोर्ट

- Advertisement -

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग आहे. नाशिक, अहमदनगर, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना आणि ठाणे या दहा जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे. महामार्गामुळे नागपूर- मुंबई मार्गावरील 10 जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच अन्य 14 जिल्हे मुंबईतील जेएनपीटी सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होईल.

महामार्गावरील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी राज्यमार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. यामुळे जळगाव, धुळे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, पालघर आणि रायगड हे 14 जिल्हेही या मार्गाशी जोडले जातील. म्हणजे राज्यातले एकूण 24 जिल्हे या द्रुतगती मार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. एकूण 10 जिल्हे 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे. सुरुवातीला 40 हजार कोटींचा हा प्रकल्पाची किंमत आता 56 हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

710 किमी – महामार्गाची लांबी

150 किमी – वेगमर्यादा

6 तास – वेळ लागणार

50 पेक्षा जास्त उड्डानपुल

400 पेक्षा जास्त भुयारीमार्ग वाहनांसाठी

300 पेक्षा जास्त भुयारीमार्ग पादचार्‍यांसाठी

2022 मध्ये प्रकल्प पुर्ण

लाभार्थी शेतक-यांना मिळालेला मोबदला

एकूण लाभार्थी : 23 हजार 500

वितरित झालेला मोबदला : 6 हजार 600 कोटी रुपये

काय आहेत वैशिष्टे

-महामार्गाच्या दोन्ही बाजूला पूरक रस्ते (सर्व्हिस रोड्स)

– मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा 22.5 मीटर्सचा. यामुळे भविष्यात लेनची संख्या वाढवता येणार

-महामार्गावर सर्वत्र लँडस्केपिंग, बोगद्यांमध्ये भुयारी मार्गावर दिवे

-समृद्धी द्रुतगती महामार्ग शून्य अपघात मार्ग असेल

– संपुर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

– प्रत्येक 5 कि.मी वर दूरध्वनी सेवा

– पुरक मार्गाला ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन्स आणि वीज वाहतुक सुविधा

– इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याचीही सुविधा

मार्गावर 18 टाऊनशिप

समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंजेस तयार केले जाणार आहेत. असे एकूण 24 इंटरचेंजेस समृद्धी महामार्गावर असतील. या 24 पैकी 18 इंटरचेंजेसनजीक कृषी समृद्धी केंद्रांची म्हणजेच टाऊनशिपची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर ते विकसित केले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा याच असतील.

शेतमाल साठवणुकीला चालना

समृद्धी महामार्गालगत विकसित करण्यात येणार असलेल्या 19 टाऊनशिपपैकी 8 टाऊनशिप उभारणीला एमएसआरडीसीने प्राधान्य दिले आहे. औरंगाबाद, बुलडाणा आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत उभारण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर 12 लाख वृक्ष

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी 12 लाख 68 हजार रोपे लावण्यात येणार आहे. त्यासाठी 900 कोटींची तरतूद केली आहे. सात वर्षापर्यंत त्या रोपांंची निगा राखण्याची रक्कमही त्यात आहे. तसेच प्रत्येक झाडावर ़टॅग (नंबर) टाकण्यात येणार आहे.

दिलीप बिल्डकॉन, बीएससीपीएल इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नागपूर-मुंबई या 710 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. नाशिक पुर्व (सिन्नर) चे काम दिलीप बिल्डकॉन तर पश्चिम ( इगतपुरी) काम बीएससीपीएल कंपनीला दिले आहे.

टोल कसा असणार

तुम्ही जितके अंतर चालला तितकाच टोल लागणार आहे. टोल प्रणाली संपुर्ण संगणीकृत असणार आहे.

महत्वाच्या घटना

जुलै 2016 मध्ये राज्याच्या मंत्रीमंडळाकडून मान्यता.

जुलै 2017 जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु

डिसेंबर 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मार्गाचे उदघाटन

जुलै 2020 मार्गाचे 40 टक्के काम पुर्ण

- Advertisment -

ताज्या बातम्या