Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयउपमहापौर निवडीसाठी विशेष बैठक; खडके अग्रस्थानी

उपमहापौर निवडीसाठी विशेष बैठक; खडके अग्रस्थानी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

उपमहापौर पदासाठी 11 रोजी बुधवारी 11 वा. विशेष महासभेची सभा जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

- Advertisement -

नामांकन अर्ज दाखल करण्याची मंगळवारी 10 रोजी एक दिवसाची मुदत आहे. त्यामुळे नव्या उपमहापौराबाबतचे चित्र ही 1 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे.

यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त किरण देशमुख, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित राहणार आहेत.

नव्या उपमहापौरपदाचा कार्यकाळ हा 4 महिन्याचाच असल्याने आणि उपमहापौरपदाचा कोण हे नेहमीप्रमाणे वरिष्ठ पातळीवरुनच ठरविण्यात येणार असल्याने हे नाव माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून येणार आहे त्यामुळे यावेळी चुरस व गट तटाचे राजकारण होणार नसल्याचेही संकेत आहेत.

तसेच भाजपा गोटातून लेवा समाजाला हे प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. 11 रोजी बुधवारी 11 वा. नव्या उपमहापौरांची निवड घोषित होणार आहे.

काल 9 रोजी नामांकन घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत भाजपाने चार नामाकन अर्ज घेतले आहेत. त्यांचेशिवाय इतर कुणीही अजूनही अर्ज घेतले नव्हते.

आता 10 रोजी 11 ते 2 यावेळेत नगरसचिव कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. उपमहापौर कोण होणार याबाबतचे चित्र हे 10 रोजीच स्पष्ट होणार आहे.

11 रोजी निवडणूक विशेष सभेत 15 मिनिटाच्या कालावधीत नामांकन मागे घेण्यात येतील. त्यानंतर उमेदवार वाढल्यास मतदान घेण्यात येईल.

दरम्यान शिवसेना व एमआयएम गोटात अद्यापही शांतता दिसून येत आहे.यावेळीही सभागृहात ही सभा ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या