Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीसाठी विशेष सभा

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीसाठी विशेष सभा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हा परिषदेच्या (ZP) उर्वरित कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दि.१७ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हयातील सहाही पंचायत समितीच्या सभागृहात सभापतींची निवड करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाचे वाटप जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती (माहिला) या प्रवर्गासाठी आरक्षित केले आहे.

जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि.१७ ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेकरीता उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर हे पिठासन अधिकारी असतील. जिल्हा परिषदेमधील सदस्य व पंचायत समितीतील सभापती यांनी विशेष सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

पं.स.सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी १३ ला विशेष सभा

उर्वरित कालावधीसाठी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात दि.१३ ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष सभेसाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार हे पिठासन अधिकारी तर गट विकास अधिकारी सहायक पिठासीन अधिकारी असतील. संबंधित सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या