Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलीस दलाची जनमनातील प्रतिमा बदलविण्याचे काम करावे

पोलीस दलाची जनमनातील प्रतिमा बदलविण्याचे काम करावे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

पोलीस दलाची जनमनातील प्रतिमा बदलविण्याचे काम आपलेच आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी अधिकारपदाच्या

- Advertisement -

कक्षेबाहेर येऊन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडवत व विश्वास निर्माण करण्याचे काम करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले.

वार्षिक तपासणीनिमित्त दिघावकर कर्मचार्‍यांशी संवाद साधताना बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. शेवगाव पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास त्यांनी भेट दिली.

दिघावकर यांनी तालुक्यातील घडामोडी बरोबरच पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. एखाद्या घटनेनंतर व गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना जबाबदार धरून त्यांना लक्ष्य केले जाते.

मात्र जबाबदार व जागरुक नागरीक म्हणून असलेले कर्तव्य भावनेतून पोलीस दलाला सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या भेटीनिमित्त पोलिसांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. यावेळी पो. काँ. बाळासाहेब नागरगोजे यांची जीवन रक्षक पदकासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या