Thursday, April 25, 2024
Homeजळगावछायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भारत निवडणूक आयोगामार्फत दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

यातंर्गत दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

दि. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत दि. 1 जानेवारी 2021 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले नागरिक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे वंचित नागरिक पदनिर्देशित ठिकाणी नमुना-6 अर्ज भरुन मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.

एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना-7 अर्ज भरता येईल.

त्याचप्रमाणे नमुना-8 अर्ज भरुन आपल्या नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल, अथवा नमुना-8 अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघातंर्गत आपला पत्ता बदलता येईल.

याबाबतचे दावे, हरकती दि. 5 जानेवारी 2021 पर्यत निकालात काढण्यात येणार असून दि.15 जानेवारी 2021 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर एकूण 3 हजार 587 मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या संपर्कासाठी यादी गरश्रसरेप.पळल.ळप या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

नागरीकांना र्पीीिं.ळप या संकेतस्थळावरुन देखील विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करता येतील.

या विशेष मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घेवुन युवा मतदार नोंदणी तसेच मतदार यादीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या