Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपाणीपट्टी वसुलीसाठी विशेष अ‍ॅप

पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष अ‍ॅप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या NMC मुख्य निधीचा स्त्रोत असलेल्या घरपट्टीबाबत विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा चांगला लाभदेखील महापालिकेला झाला आहे. अद्याप योजनेला दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत तरी आतापर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांची वसुली झाल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे. त्याचप्रमाणे आता पाणीपट्टी वसुलीसाठीदेखील विशेष अ‍ॅप Special app for water bill recovery येणार असल्यामुळे महापालिकेची वसुली शंभर टक्के होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मागील सुमारे तीन वर्षांत महापालिकेची घरपट्टी वसुली थांबली होती. त्याप्रमाणे करोनामुळे सुमारे दोन वर्षे विशेष कारवाई झाली नाही. त्याचप्रमाणे ज्यांची थकबाकी वाढली होती त्यांच्यावरही कारवाई न करता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या सूचनेनुसार महापालिका कर विभागाने विशेष अभय योजना सुरू केली. या योजनेचा चांगला फायदादेखील होताना दिसत आहे. अभय योजनेच्या माध्यमातून पहिल्या महिन्यात 90 टक्क्यांपर्यंत दंडात्मक शुल्कमाफी देऊन घरपट्टी थकबाकी वसुलीचा महापालिकेने प्रयत्न केला.

16 ऑगस्ट 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 याकाळात थकबाकीपोटी एकूण 9 कोटी 82 लाख रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. तर सवलत म्हणून 2 कोटी 22 लाख रुपयांची दंडमाफी महापालिकेने दिली आहे. करोनामुळे महापालिकेच्या करवसुलीत मोठी घट झाल्यामुळे नियमित करदात्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सवलत योजना राबवतानाच थकबाकीदारांकडून थकित करांची वसुली करण्यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. या अभय योजनेअंतर्गत 16 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरदरम्यान थकबाकी भरणार्‍या मिळकतधारकांना शास्तीच्या रकमेत 90 टक्के तर 16 ऑक्टोबर ते 31 नोव्हेंबर यादरम्यान 70 टक्के तर 1 ते 31 डिसेंबर यादरम्यान 50 टक्के माफी देण्याची योजना आहे. मागील वर्षी अभय योजनेच्या माध्यमातून महापालिकेला 33 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

2.22 कोटींची दंडमाफी

अभय योजनेच्या माध्यमातून पहिले दोन महिने शास्ती व नोटीस फीमध्ये 90 टक्के सूट देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीला दोन महिने होत आहेत. आतापर्यंत 40,373 थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या थकबाकीदारांना 2.22 कोटी रुपयांची दंडमाफी देण्यात आली आहे. घरपट्टी थकबाकीचा आकडा 361 कोटींवर पोहोचला आहे. यामध्ये 281.12 कोटींची रक्कम फक्त थकबाकीची आहे. यात 115 कोटी रुपये केवळ दंडात्मक शुल्क आहे. उर्वरित 79.91 कोटी रुपये चालू वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट आहे.

नागरिकांना चांगली सुविधा

नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात आता फक्त 96 अधिकारी व सेवक कार्यरत आहेत. नियमित सेवक व अधिकारी निवृत्त होत असले तरी नवीन भरती होत नसल्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टीची वसुलीदेखील नियमित होत नसल्यामुळे महापालिका प्रशासन आता एक विशेष अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. येत्या एक-दोन महिन्यात ते सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतःही आपल्या पाणी मीटरचे फोटो काढून पाणीपट्टी महापालिकेत भरू शकतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे सेवकदेखील घरोघरी जाऊन फोटो काढून थेट जागेवरूनच ते अपलोड करू शकतात. यामुळे थकबाकीचा आकडा कमी होऊन नागरिकांना एक चांगली सुविधादेखील मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या