Wednesday, April 24, 2024
Homeनगरशहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर पोलीस अधिक्षकांकडून कारवाई

शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर पोलीस अधिक्षकांकडून कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली.

- Advertisement -

करोना नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील हॉटेल सुरू राहतात. यामुळे गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वतः हॉटेल हिरा पॅलेस येथे भेट दिली. त्यांच्यासोबत अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील होते. त्यांनी रात्री उशिरापर्यंत हाॅटेलमध्ये थांबलेल्यांची कानउघाडणी केली. यावेळी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

यामध्ये सुशिक्षित व प्रतिष्ठित घराण्यातील लोक आपल्या परिवारासह जेवणाचा आस्वाद घेत होते. करोना रुग्ण वाढत असताना आपण असे रात्री उशिरापर्यंत हाॅटेलमध्ये थांबणे बेजबाबदारीचे असल्याचे अधीक्षक पाटील यांनी त्यांना सांगितले. हाॅटेल मालकासह हाॅटेलमध्ये असलेल्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील हे हाॅटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असते. शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे हे हाॅटेल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या