Tuesday, April 23, 2024
Homeनगरएसपी मनोज पाटील करोना बाधित

एसपी मनोज पाटील करोना बाधित

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

एसपींचा पद्भार नुकतेच हाती घेतलेले मनोज पाटील यांना करोनाची बाधा झाली आहे. पोलिसांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

अखिलेशकुमार सिंह यांच्या जागी मनोज पाटील हे नव्याने बदलून आले आहेत. 1 ऑक्टोबरला त्यांनी एसपींचा चार्ज घेतला. गुरूवारी अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. तपासणीत त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. एसपींचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसेच मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष येऊन त्यांचे स्वागत करत वार्तालाप केला आहे. स्वत: पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची वैद्यकीय काळजी घ्यावी असे आवाहन एसपी मनोज पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या