Saturday, April 27, 2024
Homeनगरजिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना करोना

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना करोना

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. आता जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

- Advertisement -

त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली. याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देखील करोना संसर्गाचे निदान झाले आहे. या दोघांनीही स्वतः अलगीकरण कक्षात दाखल करून घेऊन उपचार सुरू केले आहे.

आमच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांनी केले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

अधीक्षक सिंह यांच्या नियुक्तीचे ठिकाण निश्चित झालेले नाही. तसेच मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या