गोंडेगावात पत्र्याच्या शेडमधील 15 सोयाबीन गोण्यांची चोरी

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील गोंडेगाव येथून पत्र्याच्या शेडमध्ये गोण्यांमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये किंमतीचे सोयाबीन चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत उदय बाळासाहेब फोपसे (वय 49, धंदा शेती, रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 10 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 ते दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान गोंडेगाव परिसरातील चितळीरोड शिवारातील शेती गट नं. 261 मधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या 40 हजार रुपये किंमतीच्या 15 सोयाबीनच्या गोण्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत.

श्री. फोपसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसात गुरनं. 451/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार सतिश गोरे हे पुढील तपास करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *