Friday, April 26, 2024
Homeनगरमुर्शतपूर-धारणगाव परिसरात तीनशे शेतकर्‍यांना सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण

मुर्शतपूर-धारणगाव परिसरात तीनशे शेतकर्‍यांना सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शेतीतील निविष्ठावरील खर्च कमी करून रासायनिक खत (Chemical fertilizer) मात्रेत बचत व्हावी या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी संगीता सोळसे यांनी तालुक्यातील मुर्शतपूर व धारणगाव (Murshatpur Dharangav) येथील तीनशे शेतकर्‍यांना कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) त्यांच्या बांधावर जात खरीप हंगामातील सोयाबीन बीजप्रक्रिया बाबत प्रशिक्षण (Training on soybean seed processing) देऊन माती व मृदा परीक्षणाबाबत सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

सहायक कृषी अधिकारी संगीता सोळसे म्हणाल्या, खरीप हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी (Soybean sowing) होते. त्यासाठी शेतकरी घाई गडबडीत छोट्या छोट्या गोष्टी विसरतो. त्यामुळे पीक उगवणी मध्ये अडचणी तयार होतात. त्यासाठी या शेतकर्‍यांना सोयाबीनमध्ये रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (Rhizobium and phosphorus soluble bacteria in soybeans) यासोबत बुरशीनाशकांची व कीटकनाशकांची बीज प्रक्रिया (Seed treatment of fungicides and pesticides) कशी करायची याचे मार्गदर्शन दिले. त्यामुळे नत्राची अधिक बचत होऊन सोयाबीन बेवड सुधारतो तसेच 45 दिवसांपर्यंत रोपमर, तांबेरा, खोडमाशी याचा प्रादुर्भाव रोखता येतो.

करोना पार्श्वभूमीवर खरीप हंगाम पूर्व तयारी या विषयावर कृषी संशोधन केंद्र निफाड (Agricultural Research Center Nifad) येथील वरिष्ठ संशोधक पोपट खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन वेबिनार आयोजित करून शेतकर्‍यांपर्यंत सोयाबीन उत्पादन वाढीबाबत त्यांचे काम चालू असून त्यांना मंडल कृषी अधिकारी चंदन अविनाश, कृषी पर्यवेक्षक राजेश तुंभारे, कृषी सहायक निलेश बिबवे, विजय अहिरे, आदींचे सहकार्य मिळत आहे.

सरपंच साधना दवंगे, सरपंच नाना चौधरी यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमात नाना रामदास शिंदे, हरिभाऊ शिंदे, अनिल दवंगे, सुनील दवंगे, विक्रांत रासकर, सदाशिव रासकर, राहुल चौधरी, दादासाहेब उगले, राजेंद्र जाधव आदी शेतकरी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या