Saturday, April 27, 2024
Homeनगरसोयाबीनला योग्य भाव नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका - धनवटे

सोयाबीनला योग्य भाव नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका – धनवटे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय भाव वाढेल या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीस काढले नाही. तरी दररोज भाव खाली येत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे, असे शेतकरी वसंत आबासाहेब धनवटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिकविले आहे. कारण गोडतेलाचे भाव गगणाला भिडलेले असताना सोयाबीन या तेलबिया पिकाची मोठ्या प्रमाणात मागील हंगामात पेरणी करून वातावरण व पाऊस चांगला झाल्यामुळे सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले. शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला. परंतु याचवेळी रब्बी हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळत असताना शेतकर्‍यांची सोयाबीन शेतात उभी होती.

सोयाबीनचे खळे झाल्यानंतर विक्रमी भाव रात्रीतून कोसळले आणि भाव पाच ते सहा हजार दरम्यान झाला. याला केंद्र सरकारचे आयात धोरण कारणीभूत ठरले आणि शेतकर्‍यांना मिळणारा भाव मिळालाच नाही. अनेक शेतकर्‍यांची आर्थिक अडचण असूनही भाव मिळेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. परंतु शेतकर्‍यांची सोयाबीन भावाची चिंता वाढली आहे असे धनवटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या