चिनोदासह परिसरात सोयाबीन काढणीस सुरुवात : एकरी उत्पादनात घट

jalgaon-digital
2 Min Read

चिनोदा chinoda ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात सोयाबीन पिकाचे (soybean crop) उत्पन्न (Earned)घेतले जाते. त्या पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची (Soybean crop) काढणीसह मळणीस (Threshing with harvesting) शेतकर्‍यांकडून (farmers) वेग देण्यात (given speed) येत असून सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी (production per acre)घट आली असून त्यातच सद्यस्थितीत सोयाबीनला भाव नसल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या जोरदार परतीच्या पावसाच्या तडाख्यातून काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीन काढणीस आता शेतकर्‍यांनी सुरूवात केली असून मात्र हाती आलेल्या एकरी उत्पादनात मोठी घट आली असून त्यातच सोयाबीनला योग्य हमीभाव देखील मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

चिनोदासह परिसरात यावर्षीच्या चालू हंगामात नगदी पीक सोयाबीनचा पेरा बर्यापैकी करण्यात आला होता. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच पिके बहरली परंतू ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला. परतीच्या पावसाने पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही.

सोयाबीनची तर अतिशय नाजूक अवस्था बनली आहे. ऐन उमेदीच्या काळात सोयाबीनवर परतीच्या पावसाचा फटका बसला. परिणामी सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे लाग कमी लागला असल्याने एकरी उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.

उत्पादनाच्या प्रमुख स्तोत्रात सोयाबीन बरोबर कपाशी येते परंतू कापसाची अवस्था ही नाजूकच आहे. दरम्यान आता सोयाबीन काढणीला आले असून काही शेतकर्‍यांकडून मजूरांच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करून थ्रेचरच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करत आहेत तर काही शेतकरी हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांकडून सोयाबीन काढणीला वेग देण्यात येत असल्याचे चित्र चिनोदासह परिसरातून पहावयास मिळत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *