Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशआजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी : ऑनलाईन खरेदीस असेल डिस्काउंट

आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी : ऑनलाईन खरेदीस असेल डिस्काउंट

नवी दिल्ली

सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond) आठव्या सीरिजचे सब्सक्रिप्शन आजपासून सुरू झाले आहे.

- Advertisement -

या योजनेत बाजारभावापेक्षा कमी दराने सोनेखरेदी करता येईल. सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme 2020-21) सी​रीज VIII सोमवारपासून ९ नोव्हेंबरपासून सुरू करत आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे सब्सक्रिप्शन खरेदी करता येईल.

SGB साठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यानंतर प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत देखील देण्यात येईल. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी ही किंमत ५१२७ रुपये असेल. याआधीच्या १२ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ५०५१ रुपये होती.

या योजनेत १ ग्रॅम तर जास्तीत जास्त ४ किलो सोन्याची गुंतवणूक करता येते. या बाँडच्या मॅच्यूरिटीचा कालावधी ८ वर्षांचा असतो. मात्र यामध्ये गुंतवणुकीनंतर पाचव्या वर्षी स्कीममधून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असतो.

वार्षिक किती व्याज मिळेल

आरबीआय भारत सरकारच्या वतीने सॉव्हरिन सुवर्ण बाँड योजना २०२०-२०२१ची घोषणा करत आहे. सुवर्ण बाँड हा एक ग्रॅम सोन्याच्या गुणकात घेतला जाऊ शकतो. याचा अवधी आठ वर्षांचा आहे आणि पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

काय आहे सुवर्ण बाँडमध्ये गुंतवणुकीची मर्यादा?

गोल्ड बाँडमध्ये कमीत कमी एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येते आणि सामान्य माणसासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा किलो इतकी आहे. तर हिंदू एकत्र कुटुंबांसाठी (एचयूएफ) चार किलो आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा २० किलोग्रॅमची आहे.

कुणाकडून बाँड खरेदी करता येईल?

रिझर्व्ह बँकेनं नेमक्याच संस्थांना, विभागांना या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या अंमलबजावणीची आणि प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी दिलीय.

राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड खासगी बँका, शेड्युल्ड परदेशी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया (SHCIL0 आणि अधिकृत स्टॉक एक्सचेंज (NSR, BSE) यांच्याकडून बाँडची खरेदी करता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या