निरामय आरोग्यासाठी ध्वनी आणि संगीत सर्वोत्तम औषध : डॉ.सुजाता सिंघी

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव- jalgaon

आपल्या भारतीय संस्कृतीत (Indian culture) अगदी प्राचीन काळापासून ध्वनी आणि संगीताचे (sound and music) महत्व असून अति प्राचीन काळापासून मंदिरात वाजवणारी घंटा,निनादणारा शंख ध्वनी त्यापासून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ध्वनी (Sounds positive) ,लहरी, कंपने एक वेगळीच ऊर्जा (Different energy) निर्माण करतात. सध्याच्या तणावग्रस्त (Stressful) जीवनात (life) मनःशांतीसाठी (Peace of mind) तसेच निरामय आरोग्यासाठी (healing health) एक उत्तम औषधच आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मोटिवेशनल स्पीकर संगीतज्ञ लेखिका (Motivational Speaker Musician Writer) डॉ. सुजाता सिंग (Dr. Sujata Singh) यांनी केले.

त्या ज.जी.म.वि प्रसारक सह संस्था संचालित नूतन मराठा महाविद्यालयाच्या (Nutan Maratha College) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील कांताई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “ध्वनी व संगीत प्रभावी औषधोपचार” (“Sound and music effective medicine”) या विषयावर प्रत्यक्षिकांसह आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी डॉ. सुजाता सिंग बोलत होत्या.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही. एल. माहेश्वरी,प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एस. टी. इंगळे,जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे ,आयुक्त सतीश कुलकर्णी,एन. सी. सी. 18 महा.बटालियानचे कर्नल प्रवीण धीमन, सहकारातील नेत्या श्रीमती शैलेजाताई निकम ,माजी कुलचसचिव डॉ संभाजीराव देसाई, एन.आय एफ डी च्या प्रमुख संगीता पाटील, डॉ कल्पेश गांधी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एल पी देशमुख (Principal Dr. L. P. Deshmukh) हे होते. उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा.राजेंद्र देशमुख,प्रा.डॉ.एन. जे. पाटील, ए. बी. वाघ, संयोजिका प्रा.डॉ .माधुरी पाटील यांचेसह शहरातील रोटरी, इनरव्हील,जेसीस, लायन्स क्लब चे पदाधिकारी, डॉक्टर्स ,चार्टर्ड आकाउंटंट ,यांचेसह सामान्य नागरिक,शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा आरंभ राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने संपन्न झाला. सोबतच सुजाता सिंघी यांच्या “रिक्लेम युवर रीचेस” (“Reclaim Your Reaches) या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. परंपरागत वाद्यांच्या (traditional instruments) प्रात्यक्षिकांसह जैनम सिंघी यांच्या गिटार वाजनानेही कार्यक्रमाची रंगत वाढविली. कोरोना काळानंतर अश्या प्रकारचा अभिनव आणि समाजपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कुलगुरू प्रा.डॉ.व्ही एल माहेश्वरी,प्र कुलगुरू एस. टी. इंगळे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे ,आयुक्त सतीश कुलकर्णी,संगीता पाटील यांनी गौरवोद्गार काढले. स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचा घेतलेल्या फीडबँक मधेही सर्वानीच उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुधाकर मोते, प्रा.डॉ.पी.बी.पाटील, प्रा.शिवराज पाटील, प्रा.भारती पाटील, प्रा.नितीन बाविस्कर, प्रा.भगतसिह निकम, मणी जीव दया फाउंडेशनच्या डॉ. मणी मुथा, डॉ. हर्षित नाहाटा, डॉ अनुजा भंडारी, परेश झंवर, श्रीमती अनुप्रीत झंवर, अनिल पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *