Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशसोनू सूदला घराबाहेर पडण्यास मज्जाव, कारही जप्त; नेमकं काय घडलं?

सोनू सूदला घराबाहेर पडण्यास मज्जाव, कारही जप्त; नेमकं काय घडलं?

मोगा | Moga

सोनू सूदची (Sonu Sood) कार पंजाबमधील मतदानादरम्यान मोगा पोलिसांनी (Moga Police) अभिनेता जप्त केल्याची घटना घडली आहे. सोनू सूद हा दुसऱ्या मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे…

- Advertisement -

सोनू सूद विरोधात अकाली दलाने (Akali Dal) निवडणूक आयोगाकडे (Election Commision) तक्रार केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने सूचना दिल्या. त्यानंतर मोगा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश; राणे-शिवसेना वाद चिघळणार?

सोनू सूद आपल्या मतदान केंद्रानंतर दुसऱ्या मतदानकेंद्रांवरदेखील जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याची कार जप्त करण्यात आली असून त्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीदेखील सोनू सूद घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मोगा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप सिंह यांनी दिली.

औरंगाबाद रोडवर ट्रक-जीपचा अपघात; एक जखमी

… यामुळे मतदान केंद्रांवर गेलो : सोनू सूद

अनेक मतदान केंद्रांवर विरोधी पक्षांकडून आम्हाला धमकीचे फोन आले. अकाली दलाच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. काही मतदान केंद्रांवर त्यांनी पैसेही वाटले. यामुळे मतदान केंद्रांवर जाऊन तपासणी करणे आणि निर्भय वातावरणात मतदान होईल, हे पाहणे आमचे काम आहे. यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. मात्र आता आम्ही घरी आहोत, असे तो म्हणाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या