Friday, April 26, 2024
Homeराजकीय'त्या' मुलांना मोफत शिक्षण द्या; सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण द्या; सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

- Advertisement -

देशभरात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींनी करोनामुळे जीव गमावलेला आहे. दरम्यान,काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या मोफत शिक्षणासंदर्भात मागणी केली आहे.

सोनिया गांधी यांनी पत्रात म्हंटलं आहे की, ‘करोना साथीच्या भयावह परिस्थितीत बर्‍याच मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा घरातला कमावत्या व्यक्तीला गमावले आहे, अशा बातम्या येत आहेत. यामुळे या मुलांना मोठा धक्का बसला आहे. करोना महामारीमुळे अशा मुलांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही, त्यांना आधार देणे गरजेचं आहे.’

‘आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाचं, सोयीचं, आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात ६६१नवोदय विद्यालय आहेत. आपण करोनानं ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमावले आहेत किंवा कमावत्या पालकाचं निधन झालेलं आहे, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं,’ अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या