Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : सोनिया गांधी, राहुल गांधींनी केले मतदान

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : सोनिया गांधी, राहुल गांधींनी केले मतदान

नवी दिल्ली |New Delhi

१३७ वर्षांच्या इतिहासात काँग्रेसला (Congress) २४ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपदी गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)आणि शशी थरूर (Shashi Tharoor) या दोघांमध्ये लढत होत असून मतदानानंतर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे…

- Advertisement -

या निवडणुकीत काँग्रेस समितीचे ९, ००० पेक्षा जास्त सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असून आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी काँग्रेस मुख्यालयात मतदान (Voting) केले. तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकमधील बल्लारी (Ballari) येथे मतदान केले.

तसेच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तर काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी बंगळुरूमध्ये मतदान केले. याशिवाय काँग्रेस खासदार पी. चिदंबरम, जयराम रमेश आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात मतदान केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या