Friday, April 26, 2024
Homeधुळेविवाहितेचा खून, चौघांविरुध्द गुन्हा

विवाहितेचा खून, चौघांविरुध्द गुन्हा

सोनगीर – Songir – वार्ताहर :

बोरीस ता.धुळे येथील एका विवाहितेचा चारित्र्याचा संशयावरून सासरच्या मंडळींनी खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

- Advertisement -

याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे व दिराविरुध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. लक्ष्माबाई सुनील देवरे (वय 20) असे मयताचे नाव आहे.

मयत लक्ष्माबाई देवरे हिचे माहेर टेंभे ता. साक्री येथील असून तिचे लग्न बोरीसच्या सुनील आनंद देवरे हिच्याशी झाला. ती सुनीलची दुसरी पत्नी होती.

सर्व कुटुंब बोरीसला एकाच्या शेतात राहतात. लग्नापासून तिच्यावर चारित्र्याचा संशयावरून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

शनिवारी तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक जखमा करून तिला ठार करण्यात आले. हा खून संशयित सुनील देवरे, आनंद देवरे, उषाबाई देवरे, राजेंद्र देवरे यांनी केल्याचे जिभाऊ नथू मोरे (रा. टेंभे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या