Thursday, April 25, 2024
Homeधुळेबस-मोटारसायकल अपघात, तरूण ठार

बस-मोटारसायकल अपघात, तरूण ठार

सोनगीर – Songir – वार्ताहर :

लामकानी-धुळे बसने मोटारसायकलला धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चारला सरवड (ता. धुळे) येथे घडली. अनिल रतीलाल पाटील (वय 28, राहणार नंदाणे, ता. धुळे) असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

लामकानीहून धुळ्याकडे जाणारी बसने (क्रमांक एमएच 11, डीएल 9280) सरवडहून नंदाणेला जाणार्‍या मोटारसायकलला (क्रमांक एमएच 18, एव्ही1340) सरवडपासून एक किलोमीटर अंतरावर सरवड लामकानी मार्गावर धडक दिली.

त्यात मोटारसायकलस्वार अनिल पाटील हा जागीच ठार झाला. याप्रकरणी सुरेश गोरख पाटील (रा. नंदाणे) याने फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या