Wednesday, April 24, 2024
Homeनगरसोनईतील देवस्थान ईनामी जमीन बेकायदा खरेदी प्रकरणी कारवाईची मागणी

सोनईतील देवस्थान ईनामी जमीन बेकायदा खरेदी प्रकरणी कारवाईची मागणी

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

तालुक्यातील सोनई येथील गट नं.157 देवस्थान ईनामी वर्ग 3 ची जमीन वर्ग 2 दाखवून बेकायदा खरेदी-विक्री प्रकरणाची चौकशी करून

- Advertisement -

दोषी अधिकारी व खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्ती यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सोमवारी दि.29 रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात श्री.गायके यांनी म्हंटले आहे की,नेवासा तालुक्यातील सोनई या ठिकाणी व्यंकटेश देवा या देवस्थानची वर्ग 3 ईनामी जमिन वर्ग 2 दाखिवण्यात आली. 32 एम प्रमाणपत्र देऊन नोंदवुन गट नं .157 क्षेत्र 57 आर ही जमिन नेवासा तहसिलदार यांचेसह इतर अधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालय ,नेवासा यांनी बनावट कागदपत्र देऊन दि.6 फेब्रुवारी 2020 रोजी दस्त क्रं.528 ने खरेदी केलेली आहे.

कुळकायदा अहमदनगर यांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरुन सदरच्या क्षेत्रातील देवस्थान जमीन वर्ग 3 असुन सदरची जमिन एका महिलेच्या नाव असून म्हणुन सदर बेकायदेशीर व बनावट खरेदी करुन घेणारे हे सोनई येथील एक सेवा निवृत्त आहे तर खरेदी देणारे नेवासा तहसिलदार आहेत. त्याला पानसवाडी येथील साक्षीदार आहेत. नेवासाचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी हे खरेदी दस्तावेज तयार केलेले आहेत.

त्यामुळे सदर जमीन खरेदी-विक्री प्रकरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने पुर्व परवानगी दिली असल्यास त्याची सत्य प्रत मिळावी. या प्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सदर अधिकारी व लोकांविरुध्द न्यायालयात मला खटला चालविण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री, महसुल मंत्री, पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या