Friday, April 26, 2024
Homeनगरसोनई व्यापारी असोसिएशनकडूनही आज बंद पाळण्याचा निर्णय

सोनई व्यापारी असोसिएशनकडूनही आज बंद पाळण्याचा निर्णय

सोनई |वार्ताहर| Sonai

मंत्री गडाख यांना जीवे ठार मारण्याच्या क्लिप व अर्वाच्य भाषा वापरण्याच्या कारणाने बुधवार दि. 27 रोजी सोनईतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सोनई व्यापारी असोसिएशनने घेतलेला आहे.

- Advertisement -

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारानंतर रविवारी व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे ठार मारण्याची धमकी व अर्वाच्य भाषा वापरल्याच्या निषेधार्थ सोनई व परिसर उद्या बुधवार दिनांक 27 रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविणार आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी यासाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार असल्याचे सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांनी सांगितले.

मंगळवारी पहाटे पुणे येथून गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी संतोष भिंगारदिवे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धानोरी जि. पुणे येथील नातेवाईकाच्या घरून पकडले. त्याचेविरुद्ध सोनई पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, दंगा व दुखापतीचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. बबलू लोंढे व ऋषिकेश शेटे हे अद्यापही फरार आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शेवगाव विभागाचे पोलिस उपधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्याकडे सोमवारीच पुढील तपास सोपविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या