भाऊ अन बापाने केला खून; नगरसूलची धक्कादायक घटना

नाशिक | Nashik

मुलगा मद्य पिऊन मारहाण करताे, म्हणूण त्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकणाऱ्या मृताच्या वडीलांसह दाेघा सख्या भावांना येवला पाेलीसांनी अटक केली आहे. या संदर्भात पाेलीसांना तरूणाची हत्या त्याच्याच नातलगांनी केल्याचे एक निनावी पत्र मिळाले हाेते. या तपासानुसार भावांनी व वडिलांनीच हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मुलगा मद्यधुंद अवस्थेत आई व वडिलांना मारहाण करत. त्यामुळे त्याचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहास दगड बांधून ताे काेपरगाव येथील मळेगावनजीक असलेल्या गोदावरी नदीत फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, मुलगा गायब किंवा मयत झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे समोर आले असून निनावी पत्राच्या आधारे कसोसीने शोध घेत पाेलीसांनी या हत्येचा छडा लावला.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील अमोल सोमनाथ वर्हे (वय १९) असे खून झालेल्या तरूणाचो नाव आहे. वडील सोमनाथ आसाराम वर्हे (वय ५०), भाऊ भीमराज सोमनाथ वर्हे (वय २४), किरण सोमनाथ वर्हे (वय २०) अशी खून करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

अमोल वर्हे चार महिन्यांपासून गायब झाला होता. त्याचा खून वडील, भाऊ आणि नातेवाईक यांनी करुन त्याचे प्रेत लोहशिंगवे येथील जंगलात पुरुन टाकलेले आहे, अशा आशयाचे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या प्राप्त झाले.

त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहानिशा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. ३० ऑगस्ट २०२० रोजी त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. तेंव्हापासून त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे नातलगांनी पोलिसांना सांगितले. अमोलचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्या दोन भावांसह वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.

घटनेच्या दिवशीसुद्धा मृताने आईवडिलांना मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली हत्या

तपासादरम्यान, पोलिसांनी अमोलच्या वडिलांसह दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली. तिघेही काहीतरी लपवत आहेत आणि विसंगत माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता पित्राच्या महिन्यातील रविवारी ९.३० वाजता अमोलची राहत्या घरात दोरीने गळफास देऊन हत्या केली अशी कबुली संशयितांनी दिली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *