Saturday, April 27, 2024
Homeनगरजावयास सासरवाडीत मारहाण

जावयास सासरवाडीत मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कौटुंबिक वादातून जावयास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. शहरातील बोल्हेगाव उपनगरात शुक्रवारी (26) सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल साळवे (वय 23, रा. भानसहिवरा, ता. नेवासे) हे चार दिवसांपूर्वी दुचाकीवरून खाली पडले होते. त्यांच्या उजव्या हाताला मार लागला होता.

- Advertisement -

त्यामुळे ते उपचारासाठी नगर येथील एका खासगी रुग्णालयात आले होते. त्यावेळेस त्यांची पत्नी ही या ठिकाणी आली. यावेळी साळवे यांचा एक्स-रे पत्नी माहेरी बोल्हेगाव येथे घेऊन गेली. साळवे हे हिरो होंडा शाईन (एमएच 16 बीजे 8220) वरून एक्स-रे आणण्यासाठी बोल्हेगाव सायंकाळी सहा वाजता येथे गेले. त्यावेळेस मेव्हणा संदेश अमरदीप थोरात याने कौटुंबिक वादातून शिवीगाळ सुरू केली. त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्याच वेळेस आजे सासरा लक्ष्मण बन्सी भालेराव, शाम लक्ष्मण भालेराव, राम लक्ष्मण भालेराव यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. साळवे यांनी ही माहिती मित्राला दिली. त्यानुसार मित्र घेण्यासाठी चैतन्य क्लासिक या हॉटेलजवळ आला. त्याच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार आरोपी संदेश अमरदीप थोरात, लक्ष्मण बन्सी भालेराव, शाम लक्ष्मण भालेराव, राम लक्ष्मण भालेराव या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या