Thursday, April 25, 2024
Homeधुळेसासरा लघुशंकेसाठी उतरताच... जावई पाच लाखांची रोकड घेवून कारसह पसार

सासरा लघुशंकेसाठी उतरताच… जावई पाच लाखांची रोकड घेवून कारसह पसार

धुळे । प्रतिनिधी Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर शिवारात सासरा गाडी थांबवून लघुशंकेसाठी उतरताच गाडीतील जावयाने पाच लाखांची रोकड घेवून जावई कारसह पसार झाल्याची खळबळजनक घटना काल दुपारी घडली.

- Advertisement -

अंकाईतील वसंत नगरात (ता.येवला जि.नाशिक) राहणारे भाईदास कांतीलाल चव्हाण (वय 54) खडी कामाचे मुकादम असून कामाचे पैसे घेवून ते जावई उमेश मगन मोरे, (रा.अंकाई वसंत नगर) याला सोबत घेवून काल दुपारी कारने (क्र.एम.एच.15 बी.एन.8055) गावी निघाले होते. 2 वाजेच्या सुमारास ते महामार्गावर सोनगीर शिवारात हॉटेल स्वागत येथे थांबले.

भाईदास चव्हाण हे लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. तेव्हा उमेश मोरे हा कार घेवून फरार झाला. गाडीमध्ये 5 लाख 20 हजार रुपयांची रोकड होती.सव्वा पाच लाखांची रोकड आणि 1 लाख 50 हजाराची गाडी असा 6 लाख 70 हजाराचा मुद्देमाल घेवून जावई फरार झाल्याची तक्रार चव्हाण यांनी सोनगीर पोलिसात दिली आहे.

भाईदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन उमेश मोरे यांच्या विरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या