Friday, April 26, 2024
Homeनाशिकगंगापूर : सोमेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

गंगापूर : सोमेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

सोमेश्वर | Someshwer

राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आज पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा केली.

- Advertisement -

सदर आदेशानुसार गंगापूररोड वरील नाशिक मधील प्राचीन व धार्मिक पुराणकाळापासून महत्व असलेले ब भाविकांचे श्रद्धा स्थान सोमेश्वर महादेव मंदिर सकाळी आठ वाजता दुग्ध महाभिषेक करून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र.८ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे व श्री सोमेश्वर महादेव संस्थान गंगापूर यांचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्या हस्ते दुग्ध महाभिषेक व महाआरती करण्यात आली.

गुरुजी प्रशांत झा यांच्या मंत्रोच्चार मध्ये दुग्धोअभिषेक करण्यात आला.यावेळी नाशिक चे डेप्युटी कमिशनर सी.डी. जाधव हे देखील उपस्थित होते.मंदिर खुले करण्यात आल्या नंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

त्यांना सर्व नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड-१९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असून, सोशल डिस्टसंसचे पालन होणेकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करण्यात आली आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर

स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.

भाविकांची तपासणी करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने कर्मचारी तैनात करण्यात आले असून, मॉस लावुनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने सहभागी होवून मंदिर व्यवस्थापन सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक विलास शिंदे यांनी केले.

मंदिर हे गेल्या आठ महिन्यापासून कोविडच्या पार्श्वभूमीवर वर बंद होते. पण शासनाने पाडवापासुन मंदिर चालु करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व व्यवसायीक आनंदी झाल्याचा पाहाण्यास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या