Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशसोमालिया बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरलं; १०० ठार, ३०० जखमी

सोमालिया बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरलं; १०० ठार, ३०० जखमी

दिल्ली | Delhi

सोमालियाची राजधानी मोगादिशू (Mogadishu) पुन्हा दोन भीषण बॉम्बस्फोटाने हादरली आहे. (Somalia Bomb Blast) या स्फोटात १०० जणांचा मृत्यू झाला असून ३०० लोख जखमी झाले आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या बाहेर हा स्फोट झाला असून राष्ट्रपती हसन शेख यांनी या या घटनेला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये दोन कारमध्ये स्फोट झाले होते. या स्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांमध्ये वढ होऊन मृतांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. दरम्यान ५ वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही उचलेली नाही. राष्ट्रपती हसन शेख महमूद यांनी अल शबाब या दहशतवादी संघटनेला या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या