Saturday, April 27, 2024
Homeनाशिकतांत्रिक अडचणी असल्यास सोडविलेले प्रश्न आपोआप सेव्ह होणार!

तांत्रिक अडचणी असल्यास सोडविलेले प्रश्न आपोआप सेव्ह होणार!

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन बॅकलॉक किंवा श्रेणीसुधार परीक्षा घेताना त्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न आपोआप सेव्ह होणार आहेत.

- Advertisement -

तसेच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीतून वेळ वाढवून दिली जाईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठातर्फे ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत बॅकलॉग आणि श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने फक्त ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. यासाठी एका तासाचा कालावधी असून, ६० प्रश्नांपैकी ५० प्रश्न सोडविण्यासाठी अनिवार्य आहे. या ६० पैकी ४० टक्के सोपे, ४०टक्के मध्यम तर २० टक्के अवघड प्रश्न विचारले जातील.

अंतिम वर्षाची परीक्षा घेताना मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.

त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन करता आले नाही, परीक्षा मध्येच बंद पडली, पेपर सेव्ह झाला नाही यासह इतर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित एजन्सीला यातील त्रुटी शोधून काढून सुधारणा करण्यास सांगितले होते.

अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत, ही संख्या अंतिम वर्षाएवढीच आहे, त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे.

ऑनलाइन परीक्षा सुरू असताना तांत्रिक कारणांमुळे परीक्षा बंद पडल्यास तेवढाच कालावधी संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेत यापूर्वी सोडविलेले प्रश्न सेव्ह होऊन खंड पडल्यापासून परीक्षा पुन्हा सुरू होईल, असे परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

अडचणी येथे नाेंदवा

परीक्षा आयोजनापूर्वी किंवा परीक्षे दरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in मध्ये लॉगइन करून तक्रारी नोंदवाव्यात.

- Advertisment -

ताज्या बातम्या