Saturday, April 27, 2024
Homeनगरघनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा शहरातील रस्त्यावरील कचर्‍यामुळे रोगराईत वाढ होत असून नेवासा नगरपंचायत मार्फत घनकचरा व्यवस्थापनाचा

- Advertisement -

भोंगळ कारभार निदर्शनास येत आहे. घनकचरा व्यवस्थापन ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी नेवासा शहरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कार्यालयीन अधीक्षक गुप्ता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, नगरपंचायतला शासनाने घनकचरा ठेकेदार नियुक्त केलेला आहे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडून पडलेले दिसत आहे, काही एक-दोन प्रभाग सोडले तर बाकीच्या प्रभागात कचरा संकलन करणारी घंटागाडी चार ते पाच दिवसांनी घरातील कचरा घेण्यासाठी येत आहे.

त्यामुळे घराघरांतील कचरा घरातच साचल्याने तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेमधील रस्त्यावरही कचरा झालेला निदर्शनास येत आहे. एक तर करोनाची साथ त्यातच कचरा न उचलल्याने होणार्‍या घाणीमुळे होणारी रोगराई परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे.

त्यामुळे ठेकेदाराला तत्पर सेवा देण्याच्या संदर्भात नगरपंचायत ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी,पूर्वीप्रमाणेच कचरा संकलन होण्यासाठी आदेश द्यावेत अन्यथा त्या ठेकेदारावर योग्य कारवाई करण्यात यावी, त्याचे बिल अदा करू नये, नगरपंचायतने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शहरातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर इम्रान दारुवाले, जाकीर शेख, इम्रान पटेल, मुन्ना आतार, आब्बास बागवान, नवाब बागवान, असिर पठाण, रियाज पठाण, असिफ ईनामदार, सोहेल सय्यद, नदीम चौधरी, उमेर शेख, जैद शेख, अरबाज शेख, अजीज पठाण, अमीन शेख, शरीफ पठाण, सचिन पवार, अन्सार बागवान, अफ्फान आतार, यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या