Friday, April 26, 2024
Homeनाशिकसैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर

सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली आहे. निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा ७ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी रोजी झाली होती.

- Advertisement -

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने देशातील सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीतील प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा (ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची) अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली आहे.

ज्या उमेदवारांनी ७ आणि १४ फेब्रुवारी रोजी परीक्षा दिली आहे त्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अंतिम उत्तरपत्रिका पाहता येईल. अंतिम उत्तर तालिकेच्याच आधारे निकालाची घोषणा होणार आहे.

निकालाच्या घोषणेनंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. या चाचणीनंतर शाळांना ठरलेल्या तारखेस आपल्या वेबसाइटवर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करायची आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एन्ट्रन्स एक्झाम शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी देशातील ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशांसाठी आयोजित करण्यात आली होती.

एनटीएद्वारे परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता सहावी आणि नववी साठी प्रवेश दिला जातो. सैनिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शाळा या व्यतिरिक्त नॅशनल डिफेन्स अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि अन्य अकॅडमींसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या