Wednesday, April 24, 2024
Homeनगरसौरऊर्जेमुळे या शेतकर्‍यांना डे शिफ्ट शक्य

सौरऊर्जेमुळे या शेतकर्‍यांना डे शिफ्ट शक्य

अहमदनगर (प्रतिनिधी) –

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात विविध ठिकाणी साकारलेल्या एकूण 60 मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून

- Advertisement -

एकूण 28 कृषी विद्युत वाहिन्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. राज्यातील 50 कृषि वाहिन्यांमध्ये नाशिक परिमंडलातील 28 तथा अहमदनगर मंडळातील (जामखेड) 4 कृषी वाहिन्यांचा समावेश आहे. यातून 2600 शेतकर्‍यांना वीज मिळणार आहे.

सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ’मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खाजगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यात 5 ठिकाणी 5 मेगावॉटचे 2 म्हणजे एकूण 10 मेगावॉटचे तर अहमदनगर जिल्ह्यात 1 ठिकाणी 5 मेगावॉटचे 2 असे एकूण 6 प्रकल्प उभारण्यात आले असून असून त्याची स्थापित क्षमता 60 मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या नजीकच्या उपकेंद्रातून बाहेर पडणार्‍या कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा विद्युत उपकेंद्राजवळ सुमारे पन्नास एकरावर दहा मेगावॅटचा हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून त्याअंतर्गत 4 कृषी विद्युत वाहिन्याचा समावेश आहे.

या वाहिन्यांवरील सव्वीसशे शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

तीन टप्प्यात मिळेल वीज

दिवसा मिळणार्‍या वीज वेळेचे तीन टप्पे आहेत. यामध्ये सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेचा समावेश असेल.

कृषी विद्युत वाहिनीवरील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही. कार्यान्वित करण्यात आलेल्या कृषिवाहिन्यांवरील प्रातिनिधिक स्वरूपात ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज पुरवठा दिवसा सुरूं झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

– संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, अहमदनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या